|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शिवकालीन गडावरची पुरातन तळी जतनाची आवश्यकता

शिवकालीन गडावरची पुरातन तळी जतनाची आवश्यकता 

आजही शिवकालीन गडावर थंडी पाणी

पुरातन तळी जतनाची आवश्यकता

संगमेश्वर/ वार्ताहर

संगमेश्वर तालुक्यात चार गड असून या गडांवर आजही पुरातन तळी अस्तित्वात असून या पुरातन तळयांमधील पाणी थंड आहे. ही पुरातन तळी जतनाची आवश्यकता आहे.

दिवाळीचा सण आला की गड बनविण्याच्या विविध स्पर्धा सुरु होतात. बालगोपाळापासून वृध्दापर्यंत या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला जातो.परंतू शिवकालीन काळातील गडांच्या अस्तित्वासाठी फारसे कुणी बघत नाही. संगमेश्वर तालुक्यात शिवकालीन चार गड असून या गडावरची संपत्ती असलेली थंड गार तळी आजही अस्तित्वात असून त्याच्या जतनाची आवश्यकता आहे.संगमेश्वरचे टोक समजला जाणारा प्रचितगडाला आजही अनेक जण भेट देतात.संगमेश्वर तालुक्याच्या टोकाला आणि सह्याद्रीच्या खोऱयात असणारा प्रचितगड हा शिवकालीन असणारा गड आणि संभाजी महाराजांनी जतन केलेला गड असलेल्या गडावर सात पुरातन तळी आहेत.तर गडाच्या प्रवेशव्दाराजवळच एक पुरातन तळे आहे.संगमेश्वर तालुक्याच्या टोकाला असूनही या तळयांमध्ये थंडगार पाणी आहे.तसेच बारमाही असणारे हे पाणी गडावर जाणाऱया गडप्रेंमीना व येथील प्राणी सृष्टीला जीवनदायी ठरते.राजवाडीच्या जवळच असणारा भवानगड. सहज, सोपा आणि जवळचा गड म्हणून भवानगडाकडे पहाता येते.या गडावर असणारी भुयारे व कातळामध्ये असणारी तळी सर्वांचे आकर्षण आहे.या ठिकाणी भुयारी मार्ग असावा असे मानले जाते परंतू अजूनही येथे संशोधन न झाल्याने मार्ग सापडलेला नाही.परंतू गडाच्या दोन्ही बाजूला पुरातन तळी आहेत.त्यांचे पाणीही बारमाही असते.ही पुरातन तळी दिवसेंदिवस नष्ट होत असून ती जतनाची आवश्यकता आहे.तसेच बेलारी कुडींजवळील महिमान गडावर व भैरवगडावर पुरातन तळी असून ही तळी जतनाची आवश्यकता आहे.

Related posts: