|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » मनोरंजन » चांदण बिलोरी कळय़ा गीताला अमृता फडणवीस यांचा स्वरसाज

चांदण बिलोरी कळय़ा गीताला अमृता फडणवीस यांचा स्वरसाज 

अनेक भाव-भावना गीत-संगीताच्या माध्यमांतून जास्त प्रभावीपणे व्यक्त करता येतात. असंख्य गीतांतून आपल्याला त्याचा प्रत्यय आलेला आहेच. आई आणि मुलगी यांच्या प्रेमाची वेगळी छटा दाखविणारं असेच एक हृदयस्पर्शी गीत ‘परी हूँ मैं’ या आगामी मराठी चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. गायिका अमफता फडणवीस यांच्या आवाजात नुकतंच हे गीत ध्वनिमुद्रित करण्यात आलं.

 चांदण बिलोरी कळय़ा आकाशीच्या विझल्या… स्वप्नातल्या त्या पऱया पापण्यांना ओढूनिया निजल्या… अभिषेक खणकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीताला संगीतकार समीर सप्तीस्कर यांनी सुरेख संगीत साज चढविला आहे. हे गीत श्रोत्यांना वेगळीच अनुभूती देणार असेल असा विश्वास गायिका अमफता फडणवीस यांनी व्यक्त केला. अंगाईच्या धाटणीचे हे गीत गाण्यासाठी तितक्याच मधाळ स्वराची आवश्यकता होती. अमफता फडणवीस यांनी तितक्याच तरलतेने गायलेलं हे गीत रसिकांच्या मनाचा ठाव घेईल अशी आशा गीतकार अभिषेक खणकर  आणि संगीतकार समीर सप्तीस्कर यांनी व्यक्त केली. नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी हे कलाकार या चित्रपटात आहेत. रोहित शिलवंत दिग्दर्शित परी हूँ मैं या चित्रपटाचे निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि संचालिका शीला राजेंद्र सिंह आहेत. सहनिर्माता संजय गुजर असून कार्यकारी निर्माते भाविक पटेल आहेत. प्रोजेक्ट हेड भूषण सावळे आहेत.

Related posts: