|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » औरंगाबादेत एमबीएचा पेपर फुटला

औरंगाबादेत एमबीएचा पेपर फुटला 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एमबीएचा ’अकाउटींग फॉर मॅनेजर’ या विषयाचा पेपर सोमवारी व्हॉट्सऍपवरून फुटला. त्यामुळे आजचा एमबीएचा पेपर अखेर रद्द करण्यात आला. परीक्षा नियंत्रकांनी ही माहिती दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे 26 डिसेंबरपासून एमबीएच्या प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. आज ’अकौंटिंग फॉर मॅनेजर’ या विषयाचा पेपर वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर सुरु होता. यावेळी देवगिरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख अमजद कलीम याने पेपरचा मोबाईलवर फोटो काढला आणि फ्युचर मॅनेजर या मोबाईल व्हाट्स ऍप ग्रुपवर पाठवला. ‘फ्युचर मॅनेजर’ या ग्रुपवर पेपरचा स्नॅप आल्यानंतर ते दोघे झाडाखाली बसून उत्तर लिहित होते. त्याचवेळी सतीश पवार, हनुमंत कोरडे, रवी गवळी या कर्मचाऱयांनी त्यांना पकडले. प्रश्नपत्रिकेचा फोटो व्हॉट्सऍपवर पाठवणाऱया विद्यार्थ्याचा डीपी तपासून पाहिला. तो वर्ग क्रमांक सहामध्ये बसला होता. या तिघांनाही ताब्यात घेतले असून त्यांना विद्यार्थ्यांच्या दालनात ठेवले आहे.

 

 

 

 

Related posts: