|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » लोकल खोळंबा

लोकल खोळंबा 

प्रतिनिधी, मुंबई

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. सकाळपासून मुंबईकडे येणाऱया धीम्या आणि जलद मार्गावरील गाडय़ा 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या. ठाकुर्ली स्थानकातील रेल्वे फाटक सकाळच्या साडेसातदरम्यान उघडे राहिल्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल उशिराने धावत होत्या. हार्बर मार्गावरील गोवंडी-चेंबूरदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने लोकलसेवा ठप्प झाली होती. या दोन्ही घटनांमुळे मध्य आणि हार्बरवरील वाहतूकसेवेचा बोजवारा उडाला होता. लोकलखोळंब्यामुळे ऐन गर्दीच्यावेळी सकाळी ऑफिसला निघालेल्या प्रवाशांची अडचण झाली होती.

नववर्षाचा पहिलाच दिवस असल्याने ऑफिसला जाण्यासाठी घरातून वेळेत निघालेल्या नोकरदार वर्गाला लेटमार्कचा त्रास सहन करावा लागला. मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली स्थानकाजवळील फाटक उघडे राहिल्याने सीएसएमटी आणि कर्जत, कसाराकडे जाणाऱया लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या. तसेच हार्बरवरील गोवंडी-चेंबूरदरम्यान सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेल्याने सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परिणामी पनवेल, नेरुळ आणि वाशीहून येणाऱया प्रवाशांची रखडपट्टी झाली. गेल्या काही महिन्यांपासून लोकलचे बिघडलेले वेळापत्रक अजूनही रुळावर आलेले नाही. डिसेंबर 2016 ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत रेल्वेच्या अशा 97 घटना घडल्या आहेत.

Related posts: