|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » झालं ते विसरून जाः शरद पवारांचे राज्यसभेत शांततेचे अवाहन

झालं ते विसरून जाः शरद पवारांचे राज्यसभेत शांततेचे अवाहन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भीमा कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद राज्यसभेतही उमटलेले पहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी समस्त नागरिकांना शांततेचे आवाहन केले. भिमा कोरेगाव प्रकरणी राज्यासह काही भागांतही आंदोलन आणि काही ठिकाणी हिंसक निदर्शने झाली. त्यावर राज्यसभेत सुरू असलेल्या चर्चेत पवार यांनी आपले मत मांडले. भिमा कोरेगाव येथे दलित समाधीवर काही समाजकंटकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. राज्यभर उमटलेले पडसाद त्याचीच एक प्रतिक्रिया होती असे पवारांनी मान्य केले. यासोबतच जे काही झाले, ते कृपया विसरून जा आणि शांत राहा असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्यसभेत पवार म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून मी हा कार्यक्रम पाहतो. गावातील सर्व जाती धर्माचे लोक सलोख्याने राहतात. या सोहळय़ानिमित्त येणाऱया लोकांची सेवाही स्थानिक लोक करताना मी पाहिले आहे. दुर्दैवाने एक महिन्यापूर्वी काही विशि÷ समुदायाचे लोक येथे येऊन गेले. दलित नेत्यांच्या सभेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. लाखो लोकांच्या संख्येने आलेल्यांवर दगडफेक करण्यात आली. राज्य सरकारने वेळी कारवाई केली असती, तर वातावरण बिघडले नसते. आता जे झालं ते झालं. आता दोन्ही समाजातील लोकांनी एकसंध राहण्याची आवश्यकता असून त्यांनी एकत्रित येत ही समस्या सोडवली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

 

 

 

 

Related posts: