|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » उद्योग » फ्लेक्सी फेअरने रेल्वेला 671 कोटी

फ्लेक्सी फेअरने रेल्वेला 671 कोटी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

निवडक रेल्वे गाडय़ांमध्ये फ्लेक्सी फेअर प्रणाली लागू करण्यात आल्याने मंत्रालयाला 671 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाल्याचे सांगण्यात आले. राजधानी, शताब्दी, दुरांतो या रेल्वेगाडय़ामध्ये फ्लेक्सी फेअर सुरू करण्यात आली. प्रत्येकी 10 टक्के जागा भरण्यात आल्यानंतर तिकिटांची किंमत 10 टक्क्यांपासून 50 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येते. सप्टेंबर 2016 पासून ही प्रणाली सुरू करण्यात आली असून नोव्हेंबर 2017 पर्यंत 671 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न गोळा करण्यात आले असे रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहिन यांनी राज्यसभेत सांगितले. रेल्वे आणि प्रवाशांच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यासाठी नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे.

Related posts: