|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Top News » कोरेगाव – भीमा हिंसाचारप्रकरणी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा

कोरेगाव – भीमा हिंसाचारप्रकरणी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा 

ऑनलाईन टीम / पुणे :

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी गुजरामधील दलित समाजाचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा उमर खालिद यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर, आता एल्गार परिषदेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव-भीमाच्या लढय़ाला 200 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 31 डिंसेबर रोजी पुण्याच्या शनिवार वाडय़ावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पण या कार्यक्रमानंतर 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा जवळच्या सणसवाडी परिसरात हिंसाचार झाला. यात एका तरुणाचाही मृत्यू झाला होता. तर स्थानिकांचे मोठे नुकसान झाले होते.

या हिंसाचाराप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे  संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर एल्गार परिषदेत भडकाऊ  भाषण केल्याप्रकरणी गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

Related posts: