|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » Top News » माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज

माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज 

ऑनलाईन टीम / मुंबई :

धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या मराठी सिनेमाच्या नावाची अखेर घोषणा करण्यात आली आहे. मकरसंक्रांतीच्या गोड मुहूर्तावर माधुरीनेच चाहत्यांसोबत हे नाव शेअर केले असून या सिनेमाचे नवे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे.

माधुरी दीक्षितच्या आगामी सिनेमाचे ‘बकेट लिस्ट’ असे नाव असून याचे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. तेजस देऊस्कर या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान हा सिनेमा रीलिज होणार आहे.

साडी नेसलेल्या, मंगळसुत्र घातलेल्या माधुरीच्या चेहऱयावरचं प्रसन्न हासू अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.तिच्या मागे गृहिणी, आई, मैत्रिण, बहिण असे शब्द लिहिलेले दिसतात. यावरुनच नात्यांवर भाष्य करणारा हा सिनेमा असेल असा प्रथमदर्शी अंदाज लावला जात आहे.

Related posts: