|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » मोदी ‘रावण’; तर राहुल ‘राम’: अमेठीत वादग्रस्त बॅनरबाजी

मोदी ‘रावण’; तर राहुल ‘राम’: अमेठीत वादग्रस्त बॅनरबाजी 

ऑनलाईन टीम / अमेठी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या अमेठी दौऱयात पोस्टरबाजी सुरू झाली असून, एका पोस्टरमध्ये राहुल गांधींना रामाच्या, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावणाच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

अध्यक्षपदाची कमान सांभाळल्यानंतर आजपासून दोन दिवस ते उत्तर प्रदेशातील अमेठी दौऱयावर आहेत. या पोस्टरमध्ये राहुल गांधींच्या हातात धनुष्यबाण दाखविला आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहा शीर असलेल्या रावणाच्या रूपात दाखवले आहे. ‘एनएआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता या पोस्टरवरून नवा राजकीय वाद सुरू होण्याची शक्यता आहे.