|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » शहीद भदाणे यांचे पार्थिव धुळयात दाखल

शहीद भदाणे यांचे पार्थिव धुळयात दाखल 

ऑनलाईन टीम / धुळे

पाकिस्तानच्या गोळीबारात शहिद झालेले धुळयाचे जवान योगेश भदाणे यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी खलाणेमध्ये दाखल झाले आहे. जवान योगेश भदाणे यांचे पार्थिव गावामध्ये पोहचताच त्यांच्या कुटुंबिय व गावकऱयांना शोक अनावर झाला.

 

शहीद जवान योगेश भदाणे हे जम्मू-कश्मीरमध्ये 108 इंजिनिअर रेजिमेंटमध्ये तैनात होते. बांदीपुरा भागात तैनात असताना पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात त्यांना वीरमरण आले.

2009 मध्ये भदाणे सैन्यात दाखल झाले होते. भदाणे यांचा विवाह सात महिण्यांपूर्वी झालेला होता.

 

Related posts: