|Thursday, January 23, 2020
You are here: Home » leadingnews » हज यात्रेचे अनुदान बंद ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

हज यात्रेचे अनुदान बंद ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केंद्र सरकारने हज यात्रेचे अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावषीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलेही अनुदान मिळणार नाही. हा निर्णय म्हणजे तुष्टीकरणाचे राजकारण न करता अल्पसंख्यांकाना सक्षम करण्याच्या धोरणाचा एक भाग आहे असे सरकारकडून सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी हज यात्रेचे अनुदान बंद करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 2012 साली 2022 पर्यंत टप्याटप्याने हज यात्रेचे अनुदान बंद करण्याचे आदेश दिले होते. हज यात्रेच्या अनुदानाची रक्कम यापुढे शैक्षणिक सक्षमीकरण आणि अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या कल्याणासाठी खर्च करण्यात येईल असे नकवी यांनी यावेळी सांगितले.

Related posts: