|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सुशील पंडित यांची मुख्यमंत्र्यांकडे काश्मिर समस्येवर चर्चा

सुशील पंडित यांची मुख्यमंत्र्यांकडे काश्मिर समस्येवर चर्चा 

प्रतिनिधी/ पर्वरी

जनहित मंडळ पर्वरीतर्फे आयोजन केलेल्या शारदा व्याख्यानमालेचे वक्ते काश्मिरचे अभ्यासक सुशील पंडित यांनी पूर्व संरक्षणमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची सदिच्छा भेट घेऊन काश्मिर समस्येवर चर्चा केली.

यावेळी त्यांच्या समवेत संजय स्कूलचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर उपस्थित होते. पूर्व संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी आपल्या कार्यकाळात काश्मिर दहशतवादाविरुद्ध कडक पावले उचलून दहशतवादास आळा घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यकाळात कित्येक वर्षे रेंगाळत असलेला माजी सैनिकांची समस्या मार्गी लावली.

डॉ. सुशील पंडित हे मूळ काश्मिरी असून ते काश्मिरचे अभ्यासक आहेत. शारदा व्याख्यान मालिकेत त्यानी काश्मिरच्या एकूण सर्व घटनावर पूर्ण माहिती दिली. ते काश्मिरचे गाढे अभ्यासक पत्रकार असून मुख्यमंत्री पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

Related posts: