|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » leadingnews » ‘पद्मावत’बंदी विरोधात निर्माते सुप्रिम कोर्टात

‘पद्मावत’बंदी विरोधात निर्माते सुप्रिम कोर्टात 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावत’ला विरोध कायम असल्याचे दिसत आहे. सेन्सॉर बोर्डाने मंजूरी दिल्यानंतरही राज्यस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि हरयाणा या राज्यांत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घलण्यात आल्याने आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

‘पद्मावती’चित्रपटावरून देशभर गोंधळ उडाल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने इतिहासकारांच्या मदतीने एक विशेष समिती नेमली होती. या समितीने चित्रपट पाहिल्यानंतर त्यात नावासह सुमारे 300 कट सुचवले.त्यानुसार बदल झाल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावत’ला मंजूरी दिली. मात्र त्यानंतरही राज्यस्थान, मध्य प्रदेश, गुजरात व हरयाणा सरकारने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली.त्यामुळे या चार प्रमुख राज्यांमध्ये चित्रपट प्रदर्शित न झाल्यास निर्मात्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे निर्मात्यांनी सुप्रिम कोर्टाच्या दरावाजा ठोठावला आहे. सेन्सार बोर्डाने परवानगी दिल्यानंतरही चित्रपटाची अडवणूक का केली जात आहे, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता न्यायालय यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

 

 

 

Related posts: