|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » राष्ट्रवादीचे साहेबराव पाटील भाजपाच्या गळाला

राष्ट्रवादीचे साहेबराव पाटील भाजपाच्या गळाला 

चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

जळगाव / प्रतिनिधी

अंमळनेर तालुक्यातील राष्ट्रवादीचे सहय़ोगी माजी अपक्ष आमदार साहेबराव पाटील यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत गुरूवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अमळनेरमध्ये एका कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला.

कृषिभूषण साहेबराव पाटील हे 2009 मध्ये अमळनेर तालुक्यातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार म्हणून ते वावरले. 2014 च्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरदेखील गेली अडीच वर्ष ते राष्ट्रवादीच्या आंदोलनात सहभागी होत होते. आज मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी भाजपात प्रवेश करीत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्यासोबत नगरसेवक राजेश पाटील, निशांत अग्रवाल यांनीदेखील भाजपात प्रवेश केला. याशिवाय पाचोरा तालुक्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदारही भाजपाच्या गळाला लागण्याची चिन्हे आहेत.

 

Related posts: