|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘गोदावरी गौरव’ पुरस्काराची घोषणा

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘गोदावरी गौरव’ पुरस्काराची घोषणा 

ऑनलाईन टीम / नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली आहे.

जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर (नाटय-चित्रपट), डॉ.स्नेहलता देशमुख (ज्ञान), तर संभाष अवचट (चित्र) यासाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत. महेश साबळे व सुदर्शन शिंदे यांना ‘साहस’ हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. डॉ.रवींद्र व स्मिता कोल्हे यांना ‘लोकसेवेसाठी’ तर पंडित सत्यशील देशपांडे यांना गायनासाठी’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

21 हजार रूपये रोख व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या 10 मार्च रोजी मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

 

Related posts: