|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » leadingnews » इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल कुरेशीला दिल्लीत अटक

इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल कुरेशीला दिल्लीत अटक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्ली पोलिसांनी सोमवारी इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. अब्दुल सुभान कुरेशी  उर्फ   तौकीर कुरेशी  असे या दहशतवाद्याचे नाव असून तो 2008मध्ये गुजरात बॉम्बस्फोटात आरोपी . तसेच पुण्यातील हल्ल्यामध्येही तौकीरचा समावेश असल्याचे दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

पोलिस कुरैशीचा बऱयाच वर्षांपासून शोध घेत होते. मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश आहे. 2008 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा तो मास्टरमाइंड होता. रिपोर्ट्सनुसार कुरैशी हा बॉम्ब तयार करण्यात तरबेज आहे. त्याला भारताचा ओसामा बिन लादेन म्हटले जाते. सिमीशीही त्याचे संबंध राहिले आहेत.

 

 

 

 

Related posts: