|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » ‘कडोंमपा’च्या महापौरांना हायकोर्टाचा दिलासा

‘कडोंमपा’च्या महापौरांना हायकोर्टाचा दिलासा 

ऑनलाईन टीम / कल्याण

   ‘कल्याण-डोंबिवली महापालिके’चे महापौर राजेंद्र देवळेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. निवडणूक रद्द करण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने रद्द केला आहे.

   मागील दोन निवडणूकीमध्ये वेगवेगळया दोन जातीची प्रमाणपत्र दिल्याचा आरोप भाजपच्या उमेदवाराने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणीत कल्याण सत्र न्यायालयानं त्यांची निवडणुकच रद्द केली होती. त्यामुळे महापौरांचं नगरसेवकपद रद्द झालं होत. मात्र याचिकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. यामुळे राजेंद्र देवळेकर यांना दिलासा मिळाला आहे. आज महापौर महापालिकेत येताच शिवसैनिकांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

   आपल्याला निवडणूकीत हरवू शकले नाहीत, ते आता अशा कुरबुरी करत आहेत, त्यांना कधीच यश मिळणार नाही, असा पलटवार विरोधकांवर महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केला.

 

Related posts: