|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कॉसमॉस बँकेची 70 वर्षावरील ज्येष्ठांसाठी नवी टॅब बँकींग सेवा

कॉसमॉस बँकेची 70 वर्षावरील ज्येष्ठांसाठी नवी टॅब बँकींग सेवा 

प्रतिनिधी/ सांगली

देशातील दुसऱया क्रमांकाच्या सर्वात मोठया कॉसमॉस बँकेने 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी टॅब बँकींग ही नवी सेवा सुरू केली असून दुर्गम, अतिग्रामीण तसेच  सांगली जिल्हयामध्ये जेथे बँकेच्या शाखा नाहीत. अशा सर्व ठिकाणी बँकेचे कर्मचारी स्वतः अशा ज्येष्ठांच्या घरी जाऊन टॅबदवारे बँकींगची सेवा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती कॉसमॉस बँकेचे संचालक डॉ. मुपुंद अभ्यंकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.

 ते म्हणाले, कॉसमॉस ही देशातील अग्रगण्य सहकारी बँक असून 112 वर्षाची अवितरतपणे ग्राहक सेवेत कार्यरत आणि बँकेच्या सात राज्यात 140 शाखा आहेत. बँकेचा एकूण व्यवसाय 25,500 कोटीवर आहे. कॉसमॉस बँकेकडून इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकीग, व्हिसा, डेबिट कार्ड, आरटीजीएस, एनईएफटी यासारख्या अत्याधुनिक सेवा ग्राहकांना देते. सातत्याने नाविन्यपुर्ण व अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आघाडीवर असलेल्या कॉसमॉस बँकेने टॅब बँकींग सेवा देण्यास सुरूवात केली आहे.

दुर्गम किंवा अतिग्रामीण तसेच जेथे बँकेच्या शाखा उघडणे शक्य होत नाही. अशा ठिकाणी तसेच बँकींगच्या घरपोच सेवा ज्यांना आवश्यक आहेत. अशा ग्राहकांसाठी  टॅब बँकींग ही सेवा सुरू करण्यात आली आहे. बँकेच्या शाखामधून देण्यात येणाऱया सर्व सेवा हया ग्राहकांच्या सोयींच्या वेळेनुसार एकाच ठिकाणी टॅब बँकींगदवारे त्यांच्या घरी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

 यात बचत खाते, तसेच कायम खाते, हफ्तेबंद ठेव खाते उघडणे, केवायसी कागदपत्रे स्विकारणे, इतर बँकांच्या खात्यात तसेच आपल्ऱया बँकेतील कोणत्याही शाखेत आपण त्वरीत पैसे हस्तांतरीत करू शकतो. टॅब बँकींग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बँकेतील सेवक आणि बँकेने नेमलेले प्रतिनिधी यांच्या मार्फत पैसे भरू किंवा काढू शकतो. असे अभ्यंकर यांनी सांगितले.

या सुविधेमध्ये टॅब, थर्मल प्रिंटर, एटीएम कार्ड रिडर, बायोमॅट्रीक आदी साधनांचा समावेश असल्याने टॅब बॅकींग आटोपशीर व उपयुक्त आहेत. कॉसमॉस बॅकेने टॅब बॅकींग संदर्भातील सेवा विनाशुल्क उपलब्ध  करून दिल्या आहेत. 31 डिसेंबरपर्यंत सर्व व्यापारी बँकांनी त्यांच्या 70 वर्षावरील वृध्द व्यक्तिंना व अपंगांना घरपोच बँकींग सेवा दिलीच पाहिजे. असा आदेश रिझर्व्ह बँकेने दिला आहे. त्याबाबत सहकार क्षेत्रामध्ये कॉसमॉस बँकेने आपणहून पुढाकार घेऊन टॅब बँकींग सेवा उपलब्ध करून दिली आहे. टॅब बँकींग ही डिजीटल बँकींगचाच पुढचा टप्पा आहे. असेही ते म्हणाले.

कॉसमॉस बँकेचे सांगलीमध्ये चार हजाराच्या आसपास ज्येष्ठ नागरिक ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांना टॅब बँकींगची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय नव्याने जे ज्येष्ठ लोक बँकेचे ग्राहक होतील. त्यांनाही ही सेवा देण्यात येणार आहे. यासाठी कोणतेशी शुल्क घेण्यात येणार नाही. केवळ 1100 रूपयामध्ये ज्येष्ठांना बँकेकडे खाती उघडता येतील.

मिरजेत बचत गटाच्या महिला प्रतिनिधींनाही या सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. बचत गटांच्या महिलांना बँकेचे प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. टॅबची किमंत 25 हजार रूपये आहे. दहा टक्के मार्जिन व 90 टक्के बँकेकडून कर्ज देऊन बचत गटांच्या महिलांना हे टॅब उपलब्ध करून देण्यात येतील. या टॅबदवारे या महिला प्रतिनिधी 50 हजारापर्यंतचे व्यवहार करू शकणार आहेत. संबधित व्यवहारासाठी विम्याचे संरक्षणही असणार आहे. कॉसमॉस बँकेने आतापर्यंत 15 बँका विलिनीकरण करून त्यांचा 200 कोटीचा तोटा भरून काढला आहे. बँकींग क्षेत्रात नव्याने येऊ घातलेले काही नियम स्वागतार्ह तर काही नियमात बदल करण्याची आवश्यकता आहे, असेही अभ्यंकर यांनी स्पष्ट केले.

Related posts: