|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » ‘पद्मावत’चे तिकीट 2400 रूपयांवर ; विरोधाला झुगारून सिनेमाला गर्दी

‘पद्मावत’चे तिकीट 2400 रूपयांवर ; विरोधाला झुगारून सिनेमाला गर्दी 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

वादाच्या भोवऱयात अडकलेला ‘पद्मावत’आज अखेर प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची चांगलीच गर्दी पहायला मिळत आहे. मुंबई, नाशिक, पुणे. नागपूरसह सर्वच शहरात तिकीट हजाराच्या वर असल्याचे दिसत आहे.

साधारण 500 रुपयांपर्यंत असणारा हा आकडा आता थेट 2400 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. भारतामध्ये इतक्मया जास्त दरात तिकीट उपलब्ध असणारा ‘पद्मावत’ हा पहिला चित्रपट ठरत असल्याचे म्हटले जात आहे.

 

‘बॉलिवूड लाइफ’ आणि काही इतर संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई- गोवा विमानप्रवासाहूनही भन्साळींच्या या ड्रीम प्रोजेक्टच्या तिकीटाचे दर जास्त असल्याचे आढळले. मुख्य म्हणजेच तिकीटाचे दर पाहून प्रेक्षक अवाक होत असले तरीही त्यांनी चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ऍडव्हान्स बुकिंगच्या उपलब्धतेमुळे या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी काही चित्रपटांमध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड पाहायला मिळाले. एकिकडे करणी सेनेचा विरोध आणि दुसरीकडे चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद अशीच परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. साधारण 500 रुपयांपर्यंत असणारा हा आकडा आता थेट 2400 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. भारतामध्ये इतक्मया जास्त दरात तिकीट उपलब्ध असणारा ‘पद्मावत’ हा पहिला चित्रपट ठरत असल्याचे म्हटले जात आहे.

 

देशभरातील थिएटरमधीलपद्मावतचे दर

 

मुंबई – पीव्हीआर वर्सोवा – 1030 रुपये

 

मुंबई – आयनॉक्स नरिमन पॉईंट – 1550 रुपये

 

मुंबई – आयनॉक्स वरळी – 1550 रुपये

 

ठाणे – सिनोपोलिस व्हिव्हियाना मॉल – 1000 रुपये

 

पुणे – आयनॉक्स बंड गार्डन – 780 रुपये

 

नाशिक – सिनेमॅक्स सिटी सेंटर मॉल – 530 रुपये

 

दिल्ली – डायरेक्टर्स कट ऍम्बयिन्स – 2400 रुपये

 

बंगळुरु – पीव्हीआर सेंट्रल स्पिरीट मॉल – 580 रुपये

 

हैदराबाद – बीव्हीके मल्टिप्लेक्स – 230 रुपये

 

 

 

 

 

 

Related posts: