|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शिवाजी महाराजकालिन शस्त्रांचे आज, उद्या कुडचडेत प्रदर्शन

शिवाजी महाराजकालिन शस्त्रांचे आज, उद्या कुडचडेत प्रदर्शन 

प्रतिनिधी /केपे :

‘भारतमाता की जय-केपे तालुका’ संघटनेतर्फे आज शुक्रवार 26 व उद्या शनिवार 27 रोजी रवींद्र भवन, कुडचडे येथे विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजकालिन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात पाऊल ठेवल्यास आज 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ‘शिवराय महात्म्य स्मृती’ हा जनजागृतीचा कार्यक्रम संघटनेतर्फे आयोजित करण्यात आला आहे. त्याविषयी माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेला केपे तालुका संरक्षक शिवानंद फळदेसाई, तालुका कार्याध्यक्ष ओंकार देसाई, खजिनदार सत्यवान नाईक, सचिव अमीर भगत, व्यवस्थाप्रमुख अभय गावस देसाई व मारूती करमली उपस्थित होते.

आज 26 रोजी केपे व सांगे भागांतील विद्यार्थ्यांसाठी, तर उद्या 27 रोजी कुडचडेतील विद्यालयांसाठी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5 पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. सदर शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन श्री चंदेश्वर भूतनाथ संस्थानाचे अध्यक्ष हर्षद गावस देसाई यांच्या हस्ते आज सकाळी 10 वा. होणार आहे.

Related posts: