|Monday, September 16, 2019
You are here: Home » Top News » अंडर  १९ वर्ल्ड कप ;  भारताची  बांगलादेशवर 131 धावांनी मात

अंडर  १९ वर्ल्ड कप ;  भारताची  बांगलादेशवर 131 धावांनी मात 

क्वीन्सटाऊन (न्यूझीलंड) : 
भारताने उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशवर १३१ धावांनी दणदणीत विजय मिळवत आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत मुसंडी मारली आहे. आता उपांत्य फेरीत भारताला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करावे लागणार आहेत. ३० जानेवारी रोजी ख्राइसचर्च येथे उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. 
भारताने  बांगलादेशला हरवून या विश्वचषकातला सलग चौथा विजय साजरा केला. या सामन्यात भारताने  बांगलादेशला विजयासाठी 266 धावांचे  आव्हान दिले होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 134 धावांत आटोपला. भारताकडून कमलेश नागरकोटीने 3 तर शिवम मावी आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. त्याआधी पृथ्वी शॉनं 40, शुभमन गिलनं 86, हार्विक देसाईनं 34 आणि अभिषेक शर्मानं 50 धावांची खेळी उभारून भारताला सर्व बाद 265 धावांची मजल मारून दिली होती.