|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » ‘एमआरआय’ मशिनने हात खेचल्याने तरूणाचा मृत्यू

‘एमआरआय’ मशिनने हात खेचल्याने तरूणाचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई

मुंबईच्या नायर रुग्णालयात आपल्या नातेवाईकाला पहायला गेलेल्या तरुणाचा रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

राजेश मारू (वय 32) असे मृत तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश हा आपल्या बहिणीच्या सासूला पाहण्यासाठी रुग्णालयात गेला. मात्र, रुग्णालयातील एमआरआय मशीन मधील ऑक्सिजन संपल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱयाने राजेशला सिलेंडर आणायला सांगितले. त्यावेळी नातेवाईकांनी सिलेंडर आणण्यासाठी विरोध केला. दरम्यान, एमआरआय मशीन बंद असल्यामुळे सिलेंडर आत घेऊन जाण्यास हरकत नसल्याचं तेथील वार्डबॉयने सांगितले. त्यानंतर राजेशने सिलेंडर आत नेले, तेव्हा सिलेंडरसोबत तो एमआरआय मशीनमध्ये ओढला गेला. राजेशचे हात या मशिनमध्ये अडकले. त्यावेळी वार्डबॉयच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर राजेशला उपचारासाठी ट्रॉमा सेंटरला हालवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान राजेशचा मृत्यू झाला. या घटनेतील दोषांवर जोपर्यंत कार्यवाही होणार नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे राजेशच्या कुटुंबियांनी सांगितले. दरम्यान, नायर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.