|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Automobiles » ‘या’ कारची किंमत आहे तब्बल 1.45 कोटी !

‘या’ कारची किंमत आहे तब्बल 1.45 कोटी ! 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मासेराती या कार कंपनीने आपली पहिली एसयूव्ही कार केली आहे. ‘लेवांटी’असे या कारचे नाव असून स्टँडर्ड, ग्रांस्पोर्ट आणि ग्रांलूस्सो या तीन व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध झाली आहे. या कारची किंमत 1.45 कोटींपासून सुरूवात होते.

या कारची टक्कर स्पर्धा जॅग्वार एफ-पेस,पोर्श आणि बीएमडब्ल्यू एक्स 6 या कारशी असणार आहे. मासेराती लेवांटी स्टँडर्ड व्हेरिएंट कारची किंमत 1,45,12054 रूपये, मासेराती लेवांटी ग्रांस्पोर्ट व्हेरिएंट कारची किंमत 1,48,63,774 रूपये तर मासेराती लेवांटी ग्रांलूस्सो व्हेरिएंट कारची किंमत 1,53,83,399 रूपये इतकी आहे. या कारमध्ये 3.0 लीटरचे व्ही 6 डिझेल इंजिन देण्यात आले आहे. ज्यामध्ये 275 पीएस पॉवर आहे. हे इंजिन 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या कारचा टॉप स्पीड 230 प्रतितास एवढा आहे. 0 ते 100 किमी प्रति तास वेग घेण्यासाठी या कारला फक्त 6.9 सेंकदांचा वेळ लागतो.

 

Related posts: