|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » नव्या आरोग्य योजनेचा आरंभ कधी?

नव्या आरोग्य योजनेचा आरंभ कधी? 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरूवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात असलेल्या प्रस्तावित राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजनेचा प्रारंभ येत्या 15 ऑगस्टला होणार की 2 ऑक्टोबरच्या गांधी जयंती दिवशी होणार याबद्दलची चर्चा आता सुरू झाली आहे. राष्ट्रीय स्वास्थ विमा योजनेची जागा ही नवी योजना घेणार आहे. त्यातून त्यामुळे वैद्यकीय उपाचार क्षेत्रात क्रांतीकारक बदल होणार असल्याचा दावा सरकारने केला आहे.

अर्थसंकल्पातील प्रस्तावानुसार सरकार अत्यंत गरीब अशा 10 कोटी कुटुंबांना विम्याचे सुरक्षा कवच देणार आहे. पण देशातील 50 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत या 10 कोटी कुटुंबांना प्रत्येकी  5 लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेस पाच वर्षात 50 हजार कोटी रूपये खर्च येण्याची शक्यता आहे. यावर्षी हा खर्च 11 हजार कोटींचा होणार असून त्याची तरतूद सरकारकडून केली जात आहे.  या योजनेचा शुभारंभ नेमका केव्हा होणार याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Related posts: