|Monday, March 30, 2020
You are here: Home » Top News » प्रकाश आंबेडकरांनी काडी करण्याचे काम करू नये :जितेंद्र अव्हाड

प्रकाश आंबेडकरांनी काडी करण्याचे काम करू नये :जितेंद्र अव्हाड 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

कोरेगाव- भीमा येथे हिंसाचार घडल्यानंतर या घटनेमागे मनुवादी संघटनांचा हात असल्याचे सर्वात प्रथम सांगण्याचे काम शरद पवारांनी केले होते. बहुजनांत एकी होत असताना प्रकाश आंबेडकरांनी काडी करण्याचे काम करू नये,असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. शरद पवार जातीयावादी असल्याचे आरोप करणारे भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

आव्हाडांनी ट्विटरवर एक व्हिडिओ क्लिप पोस्ट करून प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिले.‘ आंबेडकरसाहेब तुम्ही खूप मोठे नेते आहात,खुप ज्ञानी आहात,विद्वानही आहात, हे सगळे आम्ही मान्य करतो. निष्कारण बहुजन समाजात एकी होत असताना त्यामध्ये काडी करण्याचे काम करू नका.आपण लढत आहात, आम्ही काहीच करत नाही, असे समजू नका, असे अव्हाड म्हणाले.

 

Related posts: