|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » ‘पृथ्वी’शॉला हक्काचे घर द्या ; शिवसेना आमदाराची मागणी

‘पृथ्वी’शॉला हक्काचे घर द्या ; शिवसेना आमदाराची मागणी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अंडर-19 टीमचा कॅप्टन पृथ्वी शॉनं विश्वचषकावर भारताचे नाव कोरल्यानंतर जगभरातू त्याचे कौतुक झालेपण आपल्या घरात तो हक्काच्या चार भिंती आणि एका छतापासून वंचित आहे. त्यामुळे मुंबईत पृथ्वी शॉला हक्काचं घर द्या, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी केली आहे. यासंबंधी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पृथ्वी शॉ आधी विरारला राहत होता. मात्र, त्याने 2013 ला हॅरीस शिल्डमध्ये 500 धावा फटकावल्यानंतर आमदार पोतनीस यांनी त्याची व्यवस्था वाकोल्याच्या एसआरए कॉलनीत केली. मात्र, ही जागा अपुरी असून ती कायमस्वरुपी वास्तव्यासाठी नाही. त्यामुळे पृथ्वीला हक्काचं घर देऊन त्याला सन्मान द्यावा अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली आहे.