|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » महिला आयपीएसच्या घरावर छापा, करोडोंची अवैध संपत्ती समोर

महिला आयपीएसच्या घरावर छापा, करोडोंची अवैध संपत्ती समोर 

ऑनलाईन टीम / कोलकाता

पश्चिम मेदिनीपूरच्या माजी एसपी आयपीएस अधिकारी भायती घोष यांच्या कोलकात्यातील राहत्या घरी क्राईम ब्रांचने छापा मारला आहे.

छाप्यामध्ये जवळपास 2.5 कोटी रूपये जप्त करण्यात आले आहेत. तीन छाप्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात रक्कम सापडल्याने घोष यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एसपी पदावरून बदली नंतर नाराज झालेल्या घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर फक्त दोन दिवसातच त्यांच्या घरावर आणि जवळील पोलिस अधिकाऱयांच्या ठिकाणांवरही छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीमध्ये करोडोंची संपत्ती समोर आली आहे.

 

 

 

Related posts: