|Friday, January 24, 2020
You are here: Home » उद्योग » 500 रुपयांत मिळणार 4जी स्मार्टफोन

500 रुपयांत मिळणार 4जी स्मार्टफोन 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

रिलायन्स जिओने गेल्या वर्षांत परवडणाऱया किमतीत स्मार्टफोन दाखल केल्यानंतर अन्य दूरसंचार सेवा कंपन्यांचे धाबे दणाणले होते. आता रिलायन्स जिओविरोधात अन्य कंपन्या 500 रुपयांत स्मार्टफोन बाजारात आणण्यासाठी चर्चा करत आहेत, असे सांगण्यात आले. भारती एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोन या कंपन्यांकडून मोबाईल उत्पादन कंपन्यांबरोबर चर्चा करण्यात येत आहे. महिन्याला 60 ते 70 रुपयांमध्ये व्हाईस आणि डेटा प्लॅन देण्याचा या कंपन्यांचा विचार आहे.

रिलायन्स जिओने आपला 153 रुपयांच्या मासिक रिचार्ज प्लॅनचे मूल्य घटवित 49 रुपये केले आहे. अल्प किमतीत स्मार्टफोन, डेटा व व्हॉईस सेवेच्या किमती घसरल्याने दूरसंचार कंपन्यांच्या अल्पकालीन नफ्यावर परिणाम होण्याचा अंदाज आहे. मात्र ग्राहकांना अधिक सेवा मिळत असल्यास ते कंपनी बदलण्याचा विचार करणार नाहीत. सध्या परवडणाऱया व्हीओएलटीई फोनच्या उत्पादनांसाठी सरासरी 800 रुपये खर्च येतो. या क्षेत्राला मिळणारे 50 टक्के उत्पन्न 2जी वापरातून येते. या ग्राहकांना गमविण्याचा धोका कंपन्या पत्करणार नाहीत.

Related posts: