|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » उद्योग » वॉलमार्ट करणार फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक

वॉलमार्ट करणार फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

देशातील ऑनलाईन व्यापार क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टमधील 20 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी वॉलमार्ट ही अमेरिकन कंपनी चर्चा करत आहे. सध्या फ्लिपकार्टचे बाजारमूल्य 12 अब्ज डॉलर्स असून वॉलमार्टच्या गुंतवणुकीने ते 20 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

देशातील वाढत्या ऑनलाईन व्यापारक्षेत्राचा वेगाने विस्तार होत आहे. भारतीय बाजारपेठेवर वर्चस्व मिळविण्यासाठी फ्लिपकार्ट आणि अमेरिकन कंपनी ऍमेझॉन यांच्यामध्ये स्पर्धा आहे. ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी भारतीय उपकंपनीमध्ये 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. वॉलमार्टने फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक केल्याने ऍमेझॉनबरोबर स्पर्धा करण्यासाठी सुलभ होईल. अतिरिक्त भांडवल मिळाल्याने ऍमेझॉनबरोबर स्पर्धा करण्यास फ्लिपकार्टला सोपे होईल. भारतीय बाजारात उतरण्यासाठी वॉलमार्टकडे दोन पर्याय असून स्वतंत्र कंपनी स्थापन करणे अथवा एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत हिस्सा खरेदी करणे. अगोदरच बाजारात स्थान असणाऱया कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास वॉलमार्टकडून पसंती देण्यात आली. यापूर्वी फ्लिपकार्टमध्ये जपानच्या सॉफ्टबँक ग्रुपने 2.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत हिस्सा खरेदी केला आहे.

अमेरिका आणि चीननंतर भारतातील ऑनलाईन बाजारपेठ सर्वात मोठी आहे. 2020 पर्यंत हीचे क्षेत्र 28 अब्ज डॉलर्सचे होण्याचा अंदाज आहे. सॉफ्टबँकेने स्नॅपडीलमध्ये गुंतवणूक करत एक तृतीयांश हिस्सा खरेदी केला आहे.

Related posts: