|Monday, December 16, 2019
You are here: Home » उद्योग » ‘श्रीराम लाइफ इन्शुरन्स’ आणि ‘शुअरबडी’तर्फे भारतीयांसाठी आजीवन मोफत विमा कवच योजना

‘श्रीराम लाइफ इन्शुरन्स’ आणि ‘शुअरबडी’तर्फे भारतीयांसाठी आजीवन मोफत विमा कवच योजना 

मुंबई

 ‘श्रीराम ग्रूप’ या प्रख्यात कंपनीच्या ‘श्रीराम लाइफ इन्शुरन्स’तर्फे ‘शुअरबडी’ या कंपनीशी हातमिळवणी करण्यात आली. ‘शुअरबडी’ ही कंपनी विमा तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कार्यरत असून या कंपनीतर्फे आर्थिक सेवासुविधा पुरविल्या जातात. या दोन्ही कंपन्या एकत्रित येऊन ग्राहकांना 50 हजार रुपयांचे मोफत विमाकवच पुरविणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजीटल इंडिया’ या मोहिमेशी ही योजना जोडण्यात येणार आहेत.

या योजनेच्या पूर्ततेसाठी ‘फ्री लाइफ इन्शुरन्स पॉवर्ड बाय शुअरबडी’ नावाचे अँड्रॉइड ऍप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ ग्राहकांना होणार असून त्यांच्या मोबाईल यंत्रावर जाहिरातींचे सादरीकरण होऊन त्यांना विमाकवचाची सुविधा प्राप्त होईल. जाहिरातीच्या प्रतिमा या सलग असून त्या फोननंतर किंवा लिखित संदेशानंतर ग्राहकांना प्राप्त होतील. एका ‘टॅप’द्वारे या जाहिराती थांबविण्याचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ग्राहकांना या जाहिराती पाहण्यासाठी संपूर्ण महिन्याभरातील केवळ पाच मिनिटांचा कालावधी पुरेसा ठरेल, अशी सुविधा ‘श्रीराम ग्रूप’च्या वतीने करण्यात आली आहे. आपले विमाकवच सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहकांना जाहिरातींचे संदेश पाहणे बंधनकारक असून त्यांना आर्थिक सेवासुविधाही मिळतील.

‘श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंपनी लि.’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कॅसपारूस जाकोबस हेन्ड्रीक क्रोमहूट म्हणाले, या उपक्रमाद्वारे सर्वसामान्य ग्राहकांना सुरक्षित विमा कवच जालात आणण्याची आमची योजना आहे. ही योजना भारतामधील विमा क्षेत्राचे चित्र बदलून टाकणार आहे. समाजाच्या निम्न स्तरामधील लोकांना मदत करण्याची कंपनीची धारणा आहे.

‘डिजीटायझेशन’मुळे सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत वेगाने पोचणे शक्मय होणार असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे. हा बदल करताना ग्राहक सेवेतील सर्वोच्च मापदंडांचं पालन केले जाईल.’’

“भारतासारख्या विकसनशील देशामध्ये एखाद्या कुटुंबातील मुख्य व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबातील इतर सदस्यांना पुढील काही वर्षांसाठी मोठा आर्थिक फटका बसतो. ‘शुअरबडी’ ही कंपनी या समस्येवर उपाय असून पीडितांना खरोखरीच मदत मिळणार आहे. त्याद्वारे विमा क्षेत्राचे चित्रच पालटले जाणार आहे.

Related posts: