|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्हय़ातील शंभरावर गावे अंधारात!

जिल्हय़ातील शंभरावर गावे अंधारात! 

थकीत बिलामुळे वीज तोडली : 11 कोटी थकबाकी

प्रतिनिधी/ सांगली

वारंवार पाठपुरावा करुनही पथदिव्यांची वीजबिल भरण्यास टाळाटाळ करणाऱया जिल्हयातील 100 हून अधिक ग्रामपंचायतींना महावितरणने शनिवारी जोरदार झटका दिला. या ग्रामपंचायतींच्या हद्दीत असणाऱया सर्व पथदिव्यांच्या वीज कनेक्शन तोडण्यात आले. दरम्यान, सांगली जिल्हय़ात घरगुती, वाणिज्य व औदयोगिक वर्गवारीतील दीड लाख ग्राहकांच्याकडे सुमारे 11 कोटी 21 लाख रुपयांची थकबाकी असून या ग्राहकांच्यावरही वीज तोडण्याची टांगती तलवार कायम आहे.

प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दोन दिवसांपूर्वी थकबाकीदारांची वीज तोडण्याची विशेष मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हा महावितरणला दिले होते. त्यानुसार जिल्हय़ात शून्य थकबाकीची धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. याचा पहिला तडाका ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांना बसला. जिल्हय़ातील शंभरहून अधिक ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पथदिव्यांचे वीजबील थकल्याने कनेक्शन तोडण्यात आले आहेत. जिल्ह्यात घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक वर्गवारीतील एक लाख 44 हजार वीज ग्राहकांच्याकडे जानेवारीअखेर 11 कोटी 21 लाख थकबाकी असून ती संपूर्ण थकबाकी फेब्रुवारी महिन्यात वसूल करण्याचे आदेश ताकसांडे यांनी दिला आहे.

मार्च महिना जवळ आल्याने थकबाकीचा मोठा आकडा वाढत आहे. महावितरणच्या आर्थिक संकट ओढावले आहे. यामुळे महावितरणचा आर्थिक गाडा कोलमडत असल्याने थकबाकीदारांच्यावर टांगती तलवार होती. वारंवार थकबाकीदारांना नोटीस देऊनही थकबाकीदार पैसे भरत नसल्याने अखेर महावितरणने वीज पुरवठा खंडीत करण्याचा धडक मोहिमच हाती घेतली आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर वीज बिलांचा भरणा करुन संबंधित कार्यालयात पावती दाखून रिकनेक्शन चार्जेस भरुन वीजपुरवठा सुरळीत करुन घ्यावा लागणार आहे. ही कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरित भरणा करुन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Related posts: