|Thursday, January 23, 2020
You are here: Home » leadingnews » खातेदारांनी निश्चिंत राहावे, दोषींवर बँक कारवाई करणार ; पीएनबी एमडी

खातेदारांनी निश्चिंत राहावे, दोषींवर बँक कारवाई करणार ; पीएनबी एमडी 

ऑनलाईन टीम / मुंबई

पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार कोटींचा गंडा घालणारा नीरव मोदीने देशाबाहेर पलायन केल्याची माहिती समोर आल्यानंतर आम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालणार नाही. आम्हाला वेळ द्यह, बँक पूर्ण क्षमतेने दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती पीएनबी बॅंकेचे एमडी सुनिल मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी आपल्या मित्रांच्या सहाय्याने पँजाब नॅशनल बँकेला हा गंडा घतल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर शेअर बाजारात बँकेचे शेअर जोरदार कोसळले,त्यामुळे पीएनबीने मुंबई शेअर बाजाराला पत्र लिहले. 280 कोटी रूपयांचा घोटाळय़ाची तक्रार अगोदरच देण्यात आली आहे. नीरव मोदी यांची आई आणि भावाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पीएनबीने सीबीआयला लूकआऊट नोटीस जारी करण्यास सांगितले आहे. इडीने नीरव मोदीच्या नऊ ठिकाणच्या मालमत्तांवर छापे मारले आहेत. याबाबत मेहतांनी पत्रकार परिषद घेऊन खातेदारांनी निश्चिंत राहण्याचे अवाहन केलेआहे.‘123 वर्षात पीएनबीने अनेक चढउतार पाहिले आहेत. 2011 मध्ये घोटाळयाची माहिती मिळाली तेव्हा संबंधित यंत्रणांना माहिती दिली आणि चौकशी सुरू केली होती. बँकेची विश्वासर्हता धोक्यात आणणार नाही त्यामुळे खातेदारांनी निश्चिंत रहाले, प्रत्येक दोषींवर बँक कारवाई करण्यास सक्षम असल्याचे सुनिल मेहता यांनी स्पष्ट केले. 

   या घोटाळय़ात संबंधितांनी विदेशात राहून अन्य बँकांकडून कर्ज घेतल्याचे पंजाब नॅशनल बँकेने पत्रात नमूद केले असून या घोटाळय़ात अलाहाबाद बँक, युनियन बँक ऑफ इंडिया व खासगी क्षेत्रातील ऍक्सिस  बँकेचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Related posts: