|Monday, September 16, 2019
You are here: Home » Top News » मुंबई – अहमदाबाद हायवेवर टेंम्पो – कंटेनरचा अपघात

मुंबई – अहमदाबाद हायवेवर टेंम्पो – कंटेनरचा अपघात 

ऑनलाईन टीम / पालघर

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरजवळ टेम्पो आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता, की टेम्पो पूर्णपणे चक्काचूर झाला असून त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुंबई-अहमदाबाद हायवेवर चिंचपाडा भागात हा अपघात झाला. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱया कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो दुसऱया बाजूकडून येणाऱया टेम्पोवर धडकला. ही धडक इतकी जोरात होती, की टेम्पोचा पार चक्काचूर झाला असून अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कंटेनरमधील सामानही रस्त्यावर पसरले. अपघातामुळे या महामार्गावर दोन्ही दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अंदाजे पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सध्या येथील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.