|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भाजपच्या नव्या मुखालयाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भाजपच्या नव्या मुखालयाचे उद्घाटन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

   पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भाजपच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन झाले. नवी दिल्लीच्या लुटेन्स भागात पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावर ही नवी इमारत आहे. सत्तेत असणाऱया पक्षाचे कायमस्वरूपी मुख्यालय असण्याचे हे पहिल कार्यालय आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची सध्याची मुख्यालये सरकारी इमारतींमध्ये आहेत.

   या उद्घाटनामध्ये भाजपाचे दिग्गज नेते लालकृष्ण आडवाणी, अमित शहा, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज व मुरली मनोहर जोशी यांसारखे वरि÷ नेत्यांनीही हजेरी लावली. भाजपच्या नवीन मुखालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मोदींच्या भाषणाला सुरूवात झाली तेंव्हा मोदी भक्तांचा एकच जल्लोष पहायला मिळाला. याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले, आमचे नवीन मुख्यालय हे आमची सर्वांची कर्मभूमी असून आमचा पक्ष फक्त देशप्रेमासाठी आहे. नवीन मुख्यालयासोबत नवीन योजनाही आम्ही नवीन युवकांसाठी तयार करत आहोत. अशी पक्षाची भुमिका भाषणातून मोदी यांनी स्पष्ट केली.

भाजपच्या नवीन मुख्यालयाचे विस्तारीत स्वरूप

– मोठी सभागृहे

– टीव्ही कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी स्टुडिओ

– मुख्यालयाला कॉर्पोरेट लुक

– वीर नेत्यांची स्वतंत्र कार्यालये

– मोठे आणि अत्याधुनिक वाचनालय

– जगभरातली वृत्तपत्रं, मासिकं उपलब्ध

– व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठीची उत्तम सोय

– बैठकींसाठी प्रशस्त रूम

  या नव्या मुख्यालयात अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत. मुख्यालयाच्या परिसरात तीन इमारती आहेत. यामध्ये पक्ष पदाधिकाऱयांना राज्य, स्थानिक पातळीवर रिअल टाइम चर्चा करण्यासाठी आधुनिक उपकरणे लावण्यात आलेली आहेत. नव्या ऑफिसमध्ये भाजप नेत्यांना टेनिंग देण्यासाठी परिपुर्ण हॉल उपलब्ध आहे. सोबतच टॉप फ्लोअरवर एक म्युझियम असून यात पक्षाच्या इतिहासा संबंधीत पुस्तके ठेवण्यात आली आहेत. पक्षाचे कार्यालय स्थलांतरित करणारा भाजपा हा पहिलाच पक्ष ठरला आहे. सुप्रीम कोर्टाचे म्हणणे होते की, राजकीय पक्षांचे कार्यालय लुटियन्स झोनबाहेर असले पाहिजे. भाजपने आपले कार्यालय लुटियन्स झोनबाहेर हलवल्याने इतर पक्षांवरही असे करण्यासाठी दबाव बनू शकतो. काँग्रेसचे मुख्यालय अकबर रोडवर आहे. अशोका रोड आणि अकबर रोड दोन्ही ठिकाणी सरकारी निवासस्थाने आहेत.