|Friday, November 15, 2019
You are here: Home » उद्योग » चीनपेक्षा भारतात अधिक स्थिर विकास : डोनाल्ड पुत्र

चीनपेक्षा भारतात अधिक स्थिर विकास : डोनाल्ड पुत्र 

नवीन दिल्ली

 चीनच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आहे. देशात गुंतवणुकीसाठी नियम सुलभ करण्यात येत असल्याने अमेरिकेतून करण्यात येणाऱया गुंतवणुकीमध्ये वाढ होण्यास मदत होईल. व्यवसाय सुलभीकरणासाठी सरकारकडून निर्णय घेण्यात येत असल्याने गुंतवणूक वाढेल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी म्हटले. देशभरात उभारण्यात आलेल्या ट्रम्प टॉवरची विक्री वाढविण्यासाठी सध्या ते भारतदौऱयावर आले आहेत.

भारतात उद्योग करण्यासाठी अनेक संधी आहेत. अमेरिका आणि भारतीयांची मानसिकता सारखीच आहे. दोन्ही ठिकाणी अधिक प्रामाणिकपणा दिसून येत आहे. भारतात गुंतवणूक आणि सुधारणांसाठी आपण सकारात्मक आहोत. भारतात संधी पाहता आपल्या कंपनीने चीनपूर्वी या देशात लक्झरी सदनिका बांधण्यास प्राधान्य दिले आहे, असे त्यांनी म्हटले. ट्रम्प ऑर्गेनायझेशनने एम3एम आणि त्रिबेका डेव्हलपर्स या स्थानिक कंपन्यांबरोबर भागीदारी केली आहे. सध्या गुरुग्रामध्ये 254 सदनिका असणाऱया इमारतीचे काम सुरू असून त्यांची किंमत 5.5 कोटी ते 11 कोटी रुपयांदरम्यान आहे. मार्च 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.

Related posts: