|Saturday, March 28, 2020
You are here: Home » क्रिडा » भारतीय महिला क्रिकेट संघाचे दुहेरी मालिका विजयावर लक्ष

भारतीय महिला क्रिकेट संघाचे दुहेरी मालिका विजयावर लक्ष 

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर असलेल्या भारताच्या महिला क्रिकेट संघाने आता पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत दुहेरी मालिका विजयावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

दक्षिण आफ्रिका विरूद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. आता उभय संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जात आहे. या मालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकेवर 2-1 अशी आघाडी मिळविली आहे. आता या मालिकेतील दोन सामने बाकी आहेत. यापैकी एक सामना जिंकून ही मालिका जिंकण्यासाठी हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली  भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारतीय महिला संघाने यापूर्वी ऑस्ट्रेलियातही टी-20 मालिका जिंकली आहे. आता ते दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत टी-20 मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करतील.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा वनडे मालिकेत 4-1 असा पराभव करून आयसीसीच्या वनडे मानांकनात पहिले स्थान मिळविले. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भारतीय संघाने पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याचा इतिहास घडविला. आता उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू असून भारताने पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेवर 1-0 अशी आघाडी घेतली आहे. एकाच वेळी भारताचे पुरूष आणि महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत दुहेरी मालिका विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करतील.

Related posts: