|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अधिकारी-कर्मचारी वादात तब्बल 147 बसफेऱया रद्द

अधिकारी-कर्मचारी वादात तब्बल 147 बसफेऱया रद्द 

चिपळूण एस.टी. आगारातील गोंधळात प्रवासी वाऱयावर,

अचानक डबल डय़ुटी करण्यास नकार दिल्याने घडला प्रकार,

विभागीय कार्यालयाने मागवला अहवाल,

चालक-वाहकांवर कारवाईची शक्यता

चिपळूण

बारावी परीक्षेच्या पूर्वसंध्येला येथील मध्यवर्ती बसस्थानकात मंगळवारी दुपारनंतर अचानकपणे एस्टी चालक-वाहकांनी डबल डय़ुटी न करण्याचा पवित्रा घेतल्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत तब्बल 147 बसफेऱया रद्द कराव्या लागल्या. आगारातील एका महिला अधिकाऱयाच्या बदलीसाठी घडलेल्या या प्रकारात प्रवाशांचे मात्र अतोनात हाल झाले. या महिला अधिकाऱयासंदर्भात दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिल्यानंतर रात्री 10 वाजल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मात्र अधिकारी, कर्मचाऱयांनी प्रवाशांना वेठीस धरल्याच्या या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून येथील एका महिला अधिकारी आणि कर्मचाऱयांमध्ये वाद सुरू आहेत. नाहक त्रास देणाऱया या महिला अधिकाऱयाची बदली करावी। अशी मागणी आगारातील चालक-वाहकांनी काही दिवसांपासून केली आहे. या महिला अधिकाऱयाची बदली यापूर्वी राजापूर येथे केली होती. मात्र त्या तेथे हजर झाल्या नाहीत. त्यानंतर पुन्हा त्याची येथील आगारात नियुक्ती करण्यात आली. वादग्रस्त ठरलेल्या या महिला अधिकाऱयाची बदली इतर ठिकाणी होत नसल्याने मंगळवारी बारावी परीक्षेच्या पूर्वसंध्येला अचानकपणे एस. टी. चालक-वाहकांनी डबलडय़ुटी न करण्याचा पवित्रा घेतला.

या प्रकाराची बसची वाट पहात बसलेल्या प्रवाशांना कोणतीही कल्पना दिली गेली नव्हती. त्यामुळे दिवसभराच्या कामकाजानंतर नेहमीप्रमाणे सायंकाळी अनेक प्रवासी आगारात बसची वाट पहात उभे होते. नियोजित मार्गावरील एस्टी फेरी वेळेत लागत नसल्याचे लक्षात आल्यावर याबाबत प्रवाशांनी आगारात विचारणा सुरू केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार पुढे आला. खुद्द आगारप्रमुख डी. पी. साळवी हेदेखील एस्टी फेरीसाठी चालक-वाहकांना विनवणी करत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

एस्टी चालक-वाहक यांच्या या भूमिकेमुळे प्रवाशांना विनाकारण वेठीस धरले गेल्यानंतर संतापलेल्या प्रवाशांनी आगारात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. मात्र अपेक्षित उत्तर न मिळाल्याने प्रवाशांच्या संतापात भर पडत चालली होती. यातच अनेक प्रवाशांनी खासगी वाहतुकीचा आधार घेतला. मात्र ग्रामीण भागातील लांब पल्ल्याच्या बसवर अवलंबून असलेल्यांना मध्यरात्री घर गाठावे लागले. रात्री उशिरापर्यंत प्रवाशांना घरी पोहचावे लागले. दरम्यान, या प्रकाराची माहिती शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांना कळताच त्यांनी आगारात धाव घेतली. विभागीय नियंत्रक बारटक्के यांच्याकडे संपर्क साधल्यानंतर त्यांनी येत्या दोन दिवसांत हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, आगारातील या गोंधळात तब्बल 147 एस्टी बसफेऱया रद्द कराव्या लागल्या. यातून आगाराचे एक लाखाचे उत्पन्न घटले आहे.

वरिष्ठांनी मागवला अहवाल- साळवी

यासंदर्भात आगारप्रमुख डी. पी. साळवी यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, महिला अधिकारी व चालक-वाहक यांच्यातील वादात घडलेल्या प्रकारात प्रवाशांना विनाकारण वेठीस धरले गेले आहे. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार झाल्यानंतर आपण यांची कल्पना विभागीय कार्यालयाला दिली होती. मात्र त्यांच्याकडून याबाबत दुर्लक्ष करण्यात आले. नेमून दिलेली डबल डय़ुटी असताना ती न करण्याची भूमिका घेतलेल्या चालक-वाहकाबाबत विभागीय कार्यालयाने अहवाल मागवला आहे. त्यांच्या कारवाई होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

Related posts: