|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अखिल गोवा छत्रपती महाराज सांस्कृतिक प्रतिष्ठान पणजीतर्फे रविवारी शिवजयंती उत्सव

अखिल गोवा छत्रपती महाराज सांस्कृतिक प्रतिष्ठान पणजीतर्फे रविवारी शिवजयंती उत्सव 

प्रतिनिधी/ पणजी

 अखिल गोवा छत्रपती महाराज सांस्कृतिक प्रतिष्ठान पणजीतर्फे रविवार दि. 4 मार्च रोजी सायं. 4 वा. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवा आयोजित केला आहे. पणजी येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात जाहिर सभा व शोभायात्रा असे या उत्सवाचे स्वरुप आहे, असे या समितीचे सचिव शैलेंद्र वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 जाहिर सभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्रजे प्रसिद्ध इतिहास संशोधक शिवराम कार्लेकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक हेराल्डचे संपादक राजेंद्र देसाई उपस्थित असणार आहे.

 अखंड भारतवर्षाचे स्फुतीस्थान असलेल्या शिवाजी महाराजांची जयंती जनपुढाकाराने व युवा सहभागाने मोठय़ा प्रमाणात साजरी व्हावी यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यास समस्त राष्ट्रभिमानी गोवेकरांनी पाठिंबा द्यावा व मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आव्हाने अखिल गोवा छत्रपती महाराज सांस्कृतिक प्रतिष्ठान पणजीचे अध्यक्ष चंदकांत अमोणकर यांनी केले.

 सदर उत्सवानिमित्ताने 4 ते 14 या वयोगटातीसाठी वेशभुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, असे यावेळी शैलेंद वेलिंगकर यांनी सांगितले, यावेळी  ाrत्यांच्यासोबत देवानंद नाईक, रुपेश मस्के उपस्थित होते.

Related posts: