|Monday, September 23, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘रेडमी नोट 5 प्रो’ ग्राहकांच्या भेटीला

‘रेडमी नोट 5 प्रो’ ग्राहकांच्या भेटीला 

ऑनलाईन टीम / पुणे

भारतात अनेक वर्षापासून शाओमी रेडमीची लोकप्रियता अधिक प्रमाणात वाढत चालली आहे. रेडमीने आपल्या स्मार्टफोनच्या मालिकेत बदल न करता, सलग सिरीज चालू ठेवत, ‘रेडमी नोट 4’ नंतर ‘रेडमी नोट 5 प्रो’ हा स्मार्टफोन लॉच केला आहे. भारतीय जनसामान्यांच्या गरजा लक्षात ठेवून या स्मार्टफोनची निर्मिती करण्यात आलेली आहे.

 

‘शाओमी रेडमी 5 प्रो’ चे स्पेसिफीकेशन

‘शाओमी रेडमी 5 प्रो’ मध्ये 5.99 इंच टचस्क्रिन एचडीप्लस डिस्प्ले असून स्क्रिन रेशो 18ः9 असा आहे. यामध्ये 4/6 जीबी रॅम तर 64 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरीयंटमध्ये उपलब्ध आहे. तर इंटरनल स्टोरेज हे 128 जीबी पर्यंत वाढवता येतो. बॅक कॅमेरा हा 12 5 मेगापिक्सलचा डय़ुअल कॅमेरा आहे, तर फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सलचा सॉफ्ट सेल्फी लाईट टेक्नोलॉजीसह देण्यात आला आहे. बॅटरी मर्यादा 4000 एमएएच एवढी आहे. शाओमी रेडमी 5 प्रो हा स्मार्टफोन लेक ब्लू, ब्लॅक, गोल्ड, रोस गोल्ड या चार रंगाच्या व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईडवर आणि एमआयच्या अधिकृत साईडवर उपलब्ध आहे.

‘शाओमी रेडमी 5 प्रो’ 4 जीबी रॅम या स्मार्टफोनची किंमत 13,999 एवढी तर 6 जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत ही 16,999 एवठी आहे.