|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » ऐंशी लाखांचा घोडा घेण्यापेक्षा चार एकर जमीन घेतलेली कधीही योग्यच- शरद पवार

ऐंशी लाखांचा घोडा घेण्यापेक्षा चार एकर जमीन घेतलेली कधीही योग्यच- शरद पवार 

ऑनलाईन टीम / इंदापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाच मिनिटांच्या धावत्या इंदापूर भेटीमुळे इंदापूरातील राष्ट्रवादी काँग्रेसला ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले आहे. यावेळी पवार यांनी कार्यकर्त्यांना ‘ऐंशी लाखांचा घोडा घेण्यापेक्षा चार एकर जमीन घेतलेली कधीही योग्यच’ असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

  शरद पवार हे नांदेडचा दौऱयावरून पुण्याला जात असताना ते इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात थांबले. यावेळी पवारांनी दिलेल्या सल्यामुळे कार्यकर्त्यांवर आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. शासकीय विश्रामगृहात उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी दक्ष राहण्याच्या सूचना देत त्यांना जबाबदाराची जाणीव करून दिली. यावेळी इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पवार यांचा सत्कार करण्यात आला.

 

Related posts: