|Monday, August 19, 2019
You are here: Home » क्रिडा » मुस्कान, प्रोमिला यांना तिरंदाजीत सुवर्ण

मुस्कान, प्रोमिला यांना तिरंदाजीत सुवर्ण 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

बँकॉकमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या मुस्कान किरार आणि प्रोमिला डिमेरी यांनी अनुक्रमे महिलांच्या कांपाऊंड आणि रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदके मिळविली.

महिलांच्या कांपाऊंड प्रकारातील अंतिम फेरीत मुस्कानने मलेशियाच्या झकेरिया नादिराचा 139-136 असा पराभव केला तर रिकर्व्ह प्रकारातील अंतिम लढतीत प्रोमिलाने रशियाच्या नातालियाचा 7-3 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेत भारताच्या मधु वेदवान आणि गौरव लांबे यांनी अनुक्रमे महिला आणि पुरूषांच्या रिकर्व्ह प्रकारात कास्यपदके मिळविली. मधु वेदवानने मंगोलियाच्या इनखेतुयाचा 6-5 तर गौरवने मलेशियाच्या कमरूद्दीन हाझिकचा पराभव केला.