|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » शेतकऱयांच्या चुली विझल्या : संजय राऊतांची सरकारवर टीका

शेतकऱयांच्या चुली विझल्या : संजय राऊतांची सरकारवर टीका 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मागील तीन वर्षांत या सरकारने फक्त घोषणांचा पाऊस पाडला आणि या पवासत शेतकऱयांच्या चुली विझून गेल्या, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.

विविध मागण्यांसाठी शेतकऱयांचा किसान लाँग मोर्चा अखेर मुंबईतील अझाद मैदानावर सोमवारी पहाटे दाखल झाला आहे. सत्ताधारी भाजपा वगळता सर्वच पक्षांनी या मोर्चेला पाठिंबा दिल्याने सरकारची कोंडी झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील माध्यमांशी बोलुन आपली भूमिका स्प्ट केली आहे. ‘काँग्रेसच्या सरकारने लक्ष न दिल्यानेच या शेतकऱयांनी आपल्याला ाष्सत्ता दिली आहे. पण आपणही असेच वागत असू तर ते आपल्याला घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत.हे शेतकरी कोणत्या झेंडय़ाखाली एकत्र आलेत,हे आम्हाला पहायचे नाही.या शेतकऱयांसाठी,त्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे.त्यामुळे ते लाल झेंडय़ाखाली एकत्र आलेत म्हणून आमच्यावर टीका करून नका.आम्ही सत्तेत असतानाही सरकारच्या विरोधात शेतकऱयांच्या हितासाठी आलो असल्याचे ते म्हणाले.