|Monday, March 30, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाऊसाहेबांनी आदर्श राजकारणाचा पायंडा घातला

भाऊसाहेबांनी आदर्श राजकारणाचा पायंडा घातला 

वार्ताहर/ मडकई

गोमंतकाचे भाग्यविधाते तथा पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी खऱया अर्थाने गोव्याच्या विकासाचा पाया घातला. समजातील सर्व घटकांना एकत्र आणून  आदर्श राजकारणाचा पायंडा घालून दिला. खेडोपाडी शाळा सुरु करुन मुक्तीनंतरच्या पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. हेच विकासाचे धोरण पुढे नेण्याचे कार्य म. गो. पक्ष करीत आहे, असे उद्गार म. गो. नेते तथा बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी काढले. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या 107 व्या जयंती निमित्त फर्मागुडी येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

 मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते येथील भाऊसाहेबांच्या अर्धपुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. म. गो. पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, जिल्हा पंचायत सदस्य चित्रा फडते, शिवदास गावडे, फोंडय़ाचे नगरसेवक व्यंकटेश उर्फ दादा नाईक, गिताली तळावलीकर, निधी मामलेकर, शिवानंद सावंत, बांदोडय़ाचे सरपंच रामचंद्र नाईक, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, वाडी तळावली सरपंच दिलेश गावकर, मडकईच्या सरपंच दीपा नाईक, दुर्भाटच्या सरपंच सरोज नाईक, माजी आमदार मोहन आमशेकर, वेलिंग प्रियोळचे पंचसदस्य दामोदर नाईक, पंचसदस्य पांडुरंग गावडे, म. गो. गटाध्यक्ष अनिल नाईक, केंद्रीय समितीचे सुमित वेरेकर, पंचसदस्य लक्ष्मण विश्वास फडते, विशांत नाईक, आनंदीबाई नाईक हायस्कूलचे मुख्याध्यापक भारत नाईक, तसेच आजी माजी पंचसदस्य व म. गो. कार्यकर्ते उपस्थित होते.

 दीपक ढवळीकर म्हणाले, भाऊसाहेबांचे कार्य खूप मोठे आहे. विकासाच्या माध्यमातून समाजाला दिशा देतानाच, त्यांनी राजकारणाचा आदर्श गोव्यासमोर ठेवाला. आज गोव्यावर जे संकट आले आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी भाऊसाहेबांच्या कार्याचे स्मरण व स्फूर्ती हवी. भाऊसाहेबांची पुण्याई मोठी असून या पुण्याईवरच गोव्यावरील हे संकट दूर होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related posts: