|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » leadingnews » मिलिंद एकबोटे यांना अखेर अटक

मिलिंद एकबोटे यांना अखेर अटक 

ऑनलाईन टीम / पुणे :

भीमा- कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल असलेले समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रिम कोर्टाने फेटाळल्यानंतर एकबोटे यांना अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

मिलींद एकबोटे यांच्यावर एक जानेवारीला भीमा-कोरेगाव येथे झालेल हेंसाचार भडकवल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी मिलिंद एकबोटे हे स्वतःहून पुण्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर झाले होते. त्यांनतर आज सुप्रिम कोर्टात झालेल्या सुनावणीत एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी एकबोटेंवर अटकेची कारवाई केली.