|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » मिलिंद एकबोटेंना 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

मिलिंद एकबोटेंना 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी 

ऑनलाईन टीम / पुणे :

भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेले समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांची पोलीस कोठडी पुणे सत्र न्यायालयाने 21 माचपर्यंत वाढवली आहे. तसेच यावेळी एकबोटेंना न्यायाधीशांच्या कक्षाबाहेर काळे फासण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला.

एकबोटे यांच्यावर एक जानेवारीला भीमा-कोरेगाव येथे हेंसाचार भडकवल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी मिलिंद एकबोटे हे स्वतःहून पुण्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर झाले होते. काही दिवसांपूर्वी सुप्रिम कोर्टात झालेल्या सुनावणीत एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी एकबोटेंवर अटकेची कारवाई केली.पुणे सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत त्यांना 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आज झालेल्या सुनावणीत एकबोटेंची कोठडी 21 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.

 

 

 

Related posts: