|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटल्या जात आहे : अजित पवार

सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटल्या जात आहे : अजित पवार 

ऑनलाईन टीम / मुंबई

अंगणवाडी सेविकांना आवश्यक सेवा कायद्याखाली ‘मेस्मा’ लावण्याच्या निर्णयाविरोधात कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस आक्रमक झाले आहेत. सध्याचे सरकार हे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार करत असून त्यांची हुकुमशाही प्रवृत्ती सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे.

अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावायचे असेल तर त्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याची मागणी शिवसेनेने केली, तर ‘मेस्मा’ कायदा मागे घेतल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. या मागणीसाठी आक्रमक झालेले आमदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरले होते. अखेर विधानसभा अध्यक्षांनी काही काळासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासून सत्ताधारी भाजपा वगळता सर्वच पक्षांनी ‘मेस्मा’ कायदा मागे घेण्याची आक्रमकपणे मागणी केली. अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावायचा असेल तर त्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, अशी मागणी शिवसेने केली. शिवसेनेचा यासाठी पहिल्यापासून विरोध असल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. शिवसेनेच्या भूमिकेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे.

 

Related posts: