|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » मानवरहित रणगाडय़ांची चाचणी करतोय चीन

मानवरहित रणगाडय़ांची चाचणी करतोय चीन 

बीजिंग

 कृत्रिम बुद्धिमतेने युक्त अशा मानवरहित रणगाडय़ांची चीन चाचणी घेत आहे. बुधवारी चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने याबद्दलचे वृत्त प्रकाशित केले. चालू आठवडय़ात सरकारी वाहिन्यांनी देखील या मानवरहित रणगाडय़ांची छायाचित्रे प्रसारित केल्याचे वृत्तपत्राने म्हटले. वाहिन्यांवरील चित्रफितीत टाइप 59 रणगाडा रिमोट कंट्रोलने संचालित होताना दिसून येतो. पहिल्यांदाच चीनद्वारे निर्मित मानवरहित रणगाडा सार्वजनिक करण्यात आल्याचा दावा वृत्तपत्राने केला. टाइप 59 रणगाडा जुन्या सोव्हिएत मॉडेलवर आधारित आहे. चीनमध्ये पहिल्यांदा याचा वापर 1950 च्या दशकात झाला होता आणि तेव्हापासून अनेक रणगाडे निर्माण करण्यात आले. टाइप 59 दीर्घकाळापर्यंत सेवेत राहिल्यानेच त्याला मानवरहित रणगाडय़ात बदलणे शक्य झाल्याचे चीनच्या अधिकाऱयाने सांगितले. मानवरहित रणगाडा अन्य मानवरहित उपकरणांसोबत काम करू शकेल. उपग्रह, विमान किंवा पाणबुडय़ांकडून मिळालेली माहिती तो जमवू शकेल. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळातच सैन्याचे आधुनिकीकरण सुरू केले होते. यांतर्गत चीनने स्टील्थ लढाऊ विमाने तसेच नवीन विमानवाहू नौका तयार केल्या आहेत.

Related posts: