|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अथणी शुगर्स प्रशासनाविरोधात आंदोलन सुरूच

अथणी शुगर्स प्रशासनाविरोधात आंदोलन सुरूच 

वार्ताहर/ पाटगांव

तांबाळे येथील अथणी शुगर्सच्या भुदरगड युनीटवर गेले चार दिवस सुरू असलेले जमीनदार कामगारांचे आंदोलन कारखाना प्रशासन अधिकारी व कामगार यूनियन नेते यांच्यातील बोलणी फिस्कटल्याने कामगारांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. दरम्यान आंदोलनस्थळी आमदार प्रकाश आबिटकर यांनी कामगारांच्या भावना समजावून घेऊन या आंदोलनाला पाठींबा दिला असून आंदोलनाला शिवसेनेने पाठींबा दर्शविला आहे.

अथणी शुगर्स प्रशासनाने हंगाम संपल्यानंतर जमीनदार कामगारांना कामावरून कमी केल्याने प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात कामगारांच्या बायका मुलांनी भाग घेतला आहे. कारखान्याकडे जाणारा मुख्य रस्ता बंद करून साखर कारखान्याच्या वाहतुकीची कोंडी केली आहे. 

जमीनदार कामगारांना कायम सेवेत घ्यावे, कामावर हजर न करुन घेतलेल्या कामगारांना कायमस्वरूपी कामावर घ्यावे, वक्फ बोर्डानुसार वेतन द्यावे, वारसा हक्काने वारसदारांना कामावर घ्यावे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलक कामगार व झित्रेवाडी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून कारखान्याच्या मुख्य रस्त्यावर बायका मुलांसह ठाण मांडले आहे.   

दरम्यान शनिवारी कारखाना प्रशासन अधिकारी व चीप इंजिनिअर चद्रकांत पाटील व कामगार नेते कॉ. सम्राट मोरे, आंदोलक कामगार यांच्यातील बोलणी फिस्कटल्याने कामगारांनी आंदोलन माघार घेणार नसल्याचे सांगितते तर चर्चेसाठी अथनी शुगर्सचे डायरेक्टर न फिरकल्याने कामगार वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. तर धनाजी खोत, संग्राम सावंत, भुदरगड शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राज बेलेकर, दिगंबर पोवार, दामाजी परेरा, राजेंद्र कांबळे, शिवाजी तानवडे यांनी आंदोलनस्थळी जाऊन कामगारांना पाठिंबा व्यक्त केला. कामगारांचे प्रश्न तात्काळ मार्गी न लावल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा उप तालुका प्रमुख राज बेलेकर यांनी दिला आहे.