|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » क्रिडा » रशीद खानच्या बळींचे जलद शतक

रशीद खानच्या बळींचे जलद शतक 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

अफगाण क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज रशीद खानने वनडे क्रिकेटमधील आपले बळींचे जलद शतक झळकविले. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 44 सामन्यांत 100 बळी नोंदविले असून तो अशी कामगिरी करणारा सर्वांत विक्रमी गोलंदाज आहे. यापूर्वी म्हणजे 2016 साली ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने 52 वनडे सामन्यांत बळींचे शतक नोंदविले होते.

आयसीसीच्या वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत अफगाणचा रशीद खान दुसऱया स्थानावर आहे. हरारेमध्ये रविवारी झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक पात्र फेरीच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात रशीद खानने विंडीजच्या एस हॉपला 23 धावांवर पायचीत करून वनडेतील आपला 100 वा बळी नोंदविला. 19 वर्षीय रशीद खानने वनडेतील बळींचे अर्धशतक 26 सामन्यांत पूर्ण केले होते. अफगाणने 2019 साली इंग्लंडमध्ये होणाऱया आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपली पात्रता सिद्ध करताना आयर्लंडचा पात्र फेरीच्या सामन्यांत 5 गडय़ांनी पराभव केला होता आणि रविवारी झालेल्या सामन्यात त्यांनी विंडीजला 7 गडय़ांनी पराभवाचा धक्का दिला.

Related posts: