|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्रसंगी गोव्याच्या बसेस रोखू!

प्रसंगी गोव्याच्या बसेस रोखू! 

जनआक्रोशला पाठिंब्यासाठी कुडाळला धरणे आंदोलन : 30 रोजी आंदोलनाची पुढील दिशा

प्रतिनिधी / कुडाळ:

बांबोळी-गोवा येथील रुग्णालयात सिंधुदुर्गवासीयांना पूर्ववत मोफत आरोग्य सेवा मिळालीच पाहिजे. अन्यथा, गोव्यातील बसेस मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे जाऊ देणार नाही. तिलारीचे पाणीही रोखू, असा इशारा बुधवारी सकाळी प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे धरलेल्या आंदोलकांनी दिला. प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारले.

दोडामार्ग येथे सुरू असलेल्या आरोग्याचा जनआक्रोश आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर बुधवारी सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आले. गोवा सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, यावर तोडगा न निघाल्यास 30 मार्च रोजी कुडाळ येथे बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे सांगण्यात आले. कुडाळ शहरासह तालुक्यातून अनेक राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा व्यक्त केला.

जि. प. उपाध्यक्ष रणजित देसाई, माजी आमदार पुष्पसेन सावंत, गोवामुक्ती लढय़ातील कार्यकर्ते वसंत केसरकर, सभापती राजन जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, प्रदेश उपाध्यक्ष अमित सामंत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, मनसे जिल्हाप्रमुख धीरज परब, स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष दीपक नारकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबा मुंज, विकास कुडाळकर, मनसे तालुकाध्यक्ष बाबल गावडे, जि. प. सदस्य संजय पडते, अमरसेन सावंत, बाळ कनयाळकर, अस्मिता बांदेकर, शिल्पा घुर्ये, नगराध्यक्ष विनायक राणे, नगरसेवक महेंद्र वेंगुर्लेकर, श्रेया गवंडे, सचिन काळप, गणेश भोगटे, एजाज नाईक, संध्या तेर्से, साक्षी सावंत, प्रज्ञा राणे, सुनील बांदेकर, संजय भोगटे, भास्कर परब, शिवाजी घोगळे, संतोष डिचोलकर, दीपक गावडे, शेखर गवंडे, सूर्यकांत नाईक आदी उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, गोव्याला सिंधुदुर्गने सर्व प्रकारचे सहकार्य पेले. गोवा राज्याच्या स्थापनेनंतर रुग्णालये सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने लोकसंख्येची अट घातली होती. त्यावेळी गोव्याची लोकसंख्या कमी होती. म्हणून त्यावेळचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे आताचा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा व कारवार जिल्हा यांची लोकसंख्या दाखवून रुग्णालयास मंजुरी देण्यात आली होती. याचा गोवा सरकारला विसर पडल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला पूर्वीप्रमाणे मोफत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी लढा अधिक व्यापक करावा लागला, तरी तो करुया, असे माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनी सांगितले.

यावेळी घोषणांनी तहसील कार्यालय परिसर उपस्थितांनी दणाणून सोडला. प्रसंगी गोव्यातील येथून जाणाऱया बसेस रोखण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी आंदोलकांच्या मागणीप्रमाणे आंदोलनाच्या ठिकाणी   येऊन निवेदन स्वीकारले.

Related posts: